* मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता अनिल वाणी, पाणी पुरवठा कर्मचारी विजय माने यांच्याकडून दुर्लक्ष
खोपोली / प्रतिनिधी :- मागील तीन-चार दिवसांपासून खोपोली शहर व तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगफुटी सदृश्य परिस्थिती शहर व परिसरात दिसून येत आहे. पातळगंगा नदी दुथडी वाहत आहे. मात्र, अशा परिस्थितीत कामचुकार नगर परिषद प्रशासनामूळे सुभाषनगर, जगदीश नगर परिसराला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ऐन पावसाळ्यात नागरिकांना गणेश मंदिर परिसरातील विहिरीवरून पाणी भरावे लागत आहे.
मागील वर्षापासून सुभाषनगर मोहल्ला परिसराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अल्पसंख्यांक समाजाची वस्ती असल्याने मोहल्ला परिसराला पाण्यासाठी नाहक त्रास देण्याचे काम मागील काही महिन्यांपासून एक कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता अनिल वाणी यांच्याकडून देखील या भागाला दुय्यम वागणूक दिली जात आहे.
सुभाषनगर परिसर दरडग्रस्त परिसर असतानाही खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील, उपमुख्याधिकारी गौतम भगळे, अभियंता अनिल वाणी यांच्याकडून या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत आहे. या भागात पिण्याच्या पाण्यापासून तर स्वच्छतेबाबत या परिसरावर नेहमीच अन्याय होत आला असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.
_1_1_1_6.jpeg)