मुंबई / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काटेकोरपणे राबविण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.
✒️ योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
🤷🏻♀️ अपात्र कोण असेल?
* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी टैक्स (Tax) भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे ट्रॅक्टर सोडून कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर
📑 आवश्यक कागदपत्रे :-
* आधारकार्ड
* रेशनकार्ड
* उत्पन्नाचा दाखला
* रहिवासी दाखला
* बँक पासबुक
* अर्जदाराचा फोटो
* अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
* लग्नाचे प्रमाणपत्र
📝 कोठे करावा अर्ज :-
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.