आलिजा अजहर शेख हिचे महिन्याचे रोजे


नागोठणे / प्रतिनिधी :- इस्लाम धर्मामध्ये कलमा, हज, जकात, नमाज आणि रोजा हे पाच मूल स्तंभ महत्त्वाचे आहेत. त्यापैकी एक कठीण रोजा हा लहान मुलांना पकडणे प्रेरणादायी आहे. इस्लाम धर्मामध्ये मुलामुलींचे वय सात वर्ष पूर्ण झाले की, लहान वयोगटातील मुलांना त्यांचे आई-वडील रोजा पकडण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्यामुळे लहान मुले हे रोजा पकडण्यासाठी उत्साहीत होऊन रोजा पकडतात. 

नागोठणे येथील स्थानिक रहिवासी अजहर अलीम शेख यांची मुलगी आलीजा शेख (वय ८ वर्ष) हिने लहान वयात पवित्र रमजान महिन्याचे संपूर्ण २९ रोजे पूर्ण केले.

मार्च महिन्यात उष्णतेच्या पाढा चढलेला असताना देखील एवढ्या तापमानामध्ये रोजे ठेवणे अवघड असते. अशातच जीवाची पर्वा न करता लहान वयातील आलिजा अजहर शेख या मुलीने दररोज सकाळी पहाटे चारच्या दरम्यान गोड झोपेतून उठून रोजा पकडण्याची किमया करून दाखवून दिल्याबद्दल सर्व स्तरांतून आलिजा अजहर शेख या लहानशा मुलीचे कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post