रसायनी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश

* विकासाच्या वचनांवर संघटित होऊन जनतेचे प्रश्न सोडविणे महत्वाचे - तुकाराम गायकवाड

रसायनी / प्रतिनिधी :- शिवसेनेच्या दोन गटात कार्यकर्ते विभागल्याने मराठी माणसाचे अनेक प्रश्न अडचणी सोडवितांना सत्ता असणे हा एक अत्यंत महत्वाचा विषय मानला गेला. म्हणून अनेक शिवसैनिकांनी उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचा पर्याय निवडला. रसायनी परिसरांत सदैव २०% राजकारण व ८०% समाजकारण करणारे शिवसैनिक म्हणून तुकाराम गायकवाड यांना ओळखले जाते. मागील महिन्यात  त्यांनी शिवसेना नेते रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेक सहकाऱ्यांना घेवून प्रवेश केला होता.

आगामी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटना बांधणीसाठी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजक तुकाराम गायकवाड व नंदू पाटील यांच्यातर्फे ८ मार्च रोजी चावना विभाग शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा दिमाखात पार पडला.

यावेळी जिल्हाप्रमुख अतुल भगत, निरीक्षक रुपेश पाटील, युवासेनेचे सचिव, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, माऊली घोगरे, महिला जिल्हा संघटिका मेघा दमडे, तालुका प्रमुख प्रगती ठाकूर, केळवणे जिल्हा परिषद विभाग तुकाराम गायकवाड, पनवेल उपतालुका प्रमुख नंदू पाटील, नितीन पाटील, मनोज घरत, सुधीर पाटील, अक्षय म्हात्रे व अन्य शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post