कळंब येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

* आ. महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त "आरोग्याचा महायज्ञ" या उपक्रमांतर्गत आ. महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 20 मार्च ते 27 मार्च या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज, 26 मार्च या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, उत्तम शेळके, बदे गुरूजी, कळंब सरपंच प्रमोद कोंडिलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी  मा. उपसभापती मनोहर शेठ थोरवे, माजी सभापती राहुल विशे, शिवसेना विधानसभा संघटक शिवराम बदे, उपतालुका संपर्क प्रमुख प्रशांत झांजे, रमेश गवळी, विभाग प्रमुख भानुदास राणे, विभाग प्रमुख दशरथ ऐनकर, संतोष भुंडेरे, रवींद्र फोपे, तुषार गवळी, गणेश शेळके, मुसा पाटील, अशोक पाटील व कळंब ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य आदी उपस्थित होते. 

रायगड हॉस्पिटलचे सिईओ (CEO) पटेल तसेच रायगड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार आणि मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला. अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post