महिलांनी सतर्क राहून प्रवास करावा !

* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक प्रतिभा शेलार यांचे आवाहन

सातारा / मानसी कांबळे :- महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, व्यावसायिक महिला, नोकरदार महिला किंवा वृद्ध महिला यांनी एकट्याने प्रवास करताना सतर्क रहावे, असे आवाहन न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक तथा महालक्ष्मी आधार फाउंडेशन संस्थापिका  प्रतिभा सुनील शेलार यांनी केले आहे.

शेलार पुढे म्हणाल्या की, महिला व तरूणी यांच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र पोलिस व प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा ही देखील योग्य पद्धतीने काम करत आहे. पण प्रत्येक मुलीला व महिलेला कोणता पुरुष किंवा मुलगा आपल्याला कोणत्या नजरेने बघत आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याशी बोलत आहे, यावरून लगेच कळते की तो आपल्याकडे वाईट नजरेने बघत आहे किंवा बोलत आहे. त्यावेळी महिला व मुलींनी लगेच तिकडून दूर झाले पाहिजे, जेणेकरून वाईट घटना होण्यासाठी आपण सतर्क राहू शकतो.     

महाराष्ट्रातील सर्व महिला व मुली यांनी जिल्ह्याच्या बाहेर नोकरी व्यवसाय करत असतील किंवा शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा स्टॅन्ड परिसरामध्ये एसटी किंवा रेल्वे पकडण्यासाठी जावे लागते आणि ही जागा हा परिसर हा जरी जाण्या-येण्यासाठी, आपल्यासाठी सोयीस्कर असला तरी त्या ठिकाणी वावरत असणारी 50% लोक ही विकृत, चोर, बेवडे, बलात्कारी आणि अनेक गुन्हे दाखल असलेली असतात. गर्दीचा फायदा घेत सावज पकडण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे कसलीही माहिती पाहिजे असल्यास महिला व मुलींनी रेल्वे स्टेशन विभागातील किंवा एसटी स्टँड विभागातील यंत्रणेमध्ये जावून विचारपूस करावी. इतर कोणत्याही व्यक्तीशी चर्चा करू नये किंवा माहिती विचारू नये, त्याच्याशी बोलू नये जेणेकरून आपणच स्वतःचा जीव वाचवू शकतो, असेही आवाहन प्रतिभा शेलार यांनी केले आहे.

पोलिस यंत्रणा ही नेहमी वारंवार प्रत्येक ठिकाणी सांगत असते की अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, अनोळखी व्यक्तीला काही सांगू नका, ओळखीचा असला तरी त्या व्यक्तीशी कमी संपर्कात रहावा पण काही महिला व मुली या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःच वाईट घटनेला आमंत्रण देत असतात. हे थांबले पाहिजे, यासाठी प्रत्येक महिला व मुलीने सतर्क रहावे आणि पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे. वाईट गोष्टी लक्षात आल्याबरोबर लगेचच 112 या टोल फ्री नंबरवर कॉल करावा.

 


Post a Comment

Previous Post Next Post