रायगड / प्रतिनिधी :- 3 मार्च ते 31 मे 2025 पर्यंत ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी मीटर रिकॉलिब्रेशनला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून सर्व परवानाधारक, वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रायगड यांच्या 5 सप्टेंबर 2024 बैठकीतील निर्णयान्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत भाडेमीटर रिकॉलिब्रेशन करुन 1 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते.