केईएस इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

कर्जत / पंकेश जाधव :- के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल कडाव येथे मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी पूजन करून ग्रंथ दिंडीने करण्यात आली. या ग्रंथदिंडीत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वांचे स्वागत करून राज्यगीताने पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक गौरी संभुस यांनी केले. 

मराठी राजभाषेबद्दल सानिका टीचर व सायली टीचर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली वैद्य यांनी अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया पाटील यांनी केले. मराठी राजभाषा दिनाविषयी इयत्ता एलकेजी (Lkg) ते नववीच्या वर्गांनी आपले कलागुण, सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण केले. यात ती फुलराणी, नटसम्राट असे स्वगत ही सादर करण्यात आले होते. तसेच गौरव महाराष्ट्राचा या नृत्यातून भाषेबद्दलचा गौरव दाखविण्यात आला. विशेष कार्यक्रमांचे औचित्य साधून पुस्तक हंडी हा खेळ घेण्यात आला होता. या खेळातून भाग्यवान विजेता विद्यार्थ्यांना एक एक पुस्तक बक्षीस देण्यात आले. उत्कृष्ट अभिनय व उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यास चॉकलेट व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी रिया पाटील यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली वैद्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

Previous Post Next Post