* दिव्यातील समाज बांधव सहभागी
ठाणे / अमित जाधव :- बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे, कारण येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही तर ते हिंदूंच्या ताब्यात आहे, आणि याच प्रमुख कारणामुळे महाबोधी मुक्ती आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
या उद्देशाने सकाळी 10 वाजता जांभळी नाका ठाणे या ठिकाणी बहुसंख्येने आंबेडकर चळवळीतील नागरिक व बौद्ध समाज उपस्थित होते. ही लढाई कुठल्या पक्षाची नव्हे, ही लढाई कुठल्या संघटनेची नव्हे, तर ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, ही लढाई आपला बौध्द गया महाविहार वाचवण्यासाठी आहे, म्हणून या लढाईमध्ये प्रत्येकाने उपस्थित राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता नाही तर कधीच नाही, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. बुद्धगया महाविहार हे आपल्या बुद्धांच्या ताब्यात मिळवायचे आहे. त्याकरीता आपल्या सर्वांची उपस्थिती फार मोलाची आहे, असे आवाहन दिव्यातील आंबेडकर चळवळीचे समाजसेवक बालाजी कदम यांनी केले. या आंदोलनाला दिव्यातील शेकडो अनुयायी यावेळी उपस्थित होते.