* दिपक म्हात्रे व ज्योती म्हात्रे यांच्या मार्गदशनातून सामाजिक कार्य
पनवेल / साबीर शेख :- नवी मुंबई बेलापूर भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्या सीएसआर फंडातून दरवर्षीप्रमाणे अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या गरजू अशा संस्थांना आर्थिक मदत केली जाते.
यावर्षी दीपक म्हात्रे व ज्योती प्रकाश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर वळवली येथील जिल्हा परिषद शाळेला रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वतीने 2 संगणक, 2 कपाट असे एकूण दोन लाखांची शैक्षणिक अर्थसहाय्य मदत करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे आभार मानण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले.