अमरावती जिल्हा वकील संघाच्या स्नेहसंमेलनाची जय्यत तयारी


* वकील बांधवांच्या व्यस्त कार्यकाळामुळे मनोरंजन व्हावे तसेच त्यांच्यामधील सुप्तगुणांना वाव मिळावा याकरीता प्रयत्नशिल - ॲंड. विश्‍वास काळे

अमरावती / प्रतिनिधी :-  दरवर्षीप्रमाणे अमरावती जिल्हा वकील संघ यांच्यावतीने सन २०२४-२५ आयोजित "फ्युजन फिएस्टा" स्नेहसंमेलनाचे ३ दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान  ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या ३ दिवसीय "फ्युजन फिएस्टा" स्नेहसंमेलनाचे उद्द्घाटक म्हणून मुबंई उच्च न्यायालय न्यायमुर्ती (औरंगाबाद खंडपीठ) एस. जी. मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. यार्लगडा व अमरावती कौटुबिक न्यायालय प्रमुख न्यायाधिश आर. आर. पोंदकुले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲंड. विश्‍वास काळे असणार आहेत. 

७ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम 'रंग संस्कृतीचा रंग कलेचा' स्व. ॲंड. डी. एन. बाबरेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, प्रायोजक ॲंड. संजय बाबरेकर व सहकारी यांच्यावतीने सांय. ७ वाजता होईल. त्याचदिवशी हिन्दी एकांकिका 'किस्सा कुर्सी का' प्रायोजक ॲंड सै. खालिद अली यांच्या वतीने ७.३० वाजता होईल. तसेच मराठी एकांकिका 'उठता लात बसता बुक्की' स्व. ॲंड. एम. डी. श्रीमाळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, प्रायोजक ॲंड. डी. एम. श्रीमाळी यांच्या वतीने सांय. ८.३० वाजता आयोजन करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी पुष्पप्रदर्शनी व रांगोळी स्पर्धा प्रायोजक ॲंड. किशोर शेळके यांच्या वतीने सकाळी ९ वाजता तर सकाळी ९. ३० वाजता ट्रेझरहन्ट स्व. ॲंड. एस. झेड. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, प्रायोजक ॲंड. सुनील देशमुख यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता स्व. ॲंड. वसंतराव कोल्हटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, अंताक्षरी प्रथम फेरीचे आयोजन प्रायोजक ॲंड. नितीन कोल्हटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता कॅरम स्पर्धेचे आयोजन प्रायोजक ॲंड. नासीर शहा यांच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता स्व. ॲंड. चंद्रशेखर देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रायोजक ॲंड. अतुल चुटके यांनी केले आहे. सांय. ७ वाजता 'siren of styles the show' या फॅशन शोचे आयोजक ॲंड. प्रशांत देशपांडे यांनी केले आहे. सांय. ८ वाजता संगीत रजनी आर्केस्ट्रा या संगीतमय कार्यक्रमाचे प्रायोजक ॲंड. प्रशांत भेलांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

तिसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अंताक्षरी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन त्याचबरोबर स्मृतीशेष ज्ञानेश्वर भावसिंह सिरसाट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, कौटुबिक हिंसाचार कायद्यात पुरूषांकरीता संरक्षणात्मक तरतुदींची गरज या विषयावर वादविवाद स्पर्धा प्रायोजक ॲंड. मनिष सिरसाट यांच्या वतीने सकाळी ११ वाजता होणार आहे. दुपारी १ वाजता बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन केले आहे. सांय. ६.३० वाजता बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि सांय. ७.३० वाजता आनंद मेळावा होईल. या कार्यक्रमाच्या मनोरंजनाचा लाभ अमरावती जिल्ह्यातील वकील बांधवानी घ्यावा, असे आवाहन अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲंड. विश्‍वास काळे, सचिव ॲंड. चंद्रसेन बी. गुळसुंदरे, उपाध्यक्ष ॲंड. नितीन डी. राउत, ग्रंथालय सचिव ॲंड. मो. वसीम शेख, कार्यकरीणी सदस्य ॲंड. सोनाली ए. महात्मे, ॲंड. शाहु एन. चिखले, ॲंड. सारीका ए. भोंगाडे ठाकरे, ॲंड. विकम सरवटकर, ॲंड. सुरज जी. जामठे, ॲंड. गजानन एन. गायकवाड, ॲंड. मांगल्य डी. निर्मळ, प्रसिध्दी प्रमुख तथा अमरावती जिल्हा वकील संघ सदस्य ॲंड. राजु म. कलाने यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post