रायगड / आनंद मनवर :- परळी येथील को. ए. सो. डॉं. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शाळेचे चेअरमन ऍंड. प्रविण भाई कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या सदिच्छा समारंभात शाळेचे चेअरमन कुंभार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर यांनी मुलांना यशस्वीतेचा मंत्र देत विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्व समजून सांगून परीक्षेला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक संतोष भालेराव सर यांनी सदिच्छा भाषणात विद्यार्थ्यांना या वर्षीचा परीक्षेचे नियम तसेच एसएससी परीक्षेला शासनाने कॉपी मुक्त अभियान राबवून परीक्षा नियमात पार पडणार आहे. याविषयी माहिती देवून परीक्षेचा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.
यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षिका शिरसाळे मॅडम, संगीता बोरिटकर मॅडम, नेत्रा हिंदोले, सुरवसे सर, मनवर सर यांनी यांनी आप-आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना परीक्षेचा शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववीचा विद्यार्थ्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली. या समारंभला शाळेतील कर्मचारी घुटे मॅडम, राम बोरिटकर यांनी सहकार्य करुन उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा मोरे आणि समीक्षा शिंदे इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी केले.
