खालापूर / सुधीर देशमुख :- 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती खालापुर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी शांततेत व कुठेही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खालापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन पवार, सहायक पोलिस निरीक्षक संतोष आवटे, पोलिस उपनिरीक्षक रोहीदास भोर यांच्यासह संपूर्ण अधिकारी आज एका राईट कंट्रोल पोलिस (दंगल नीयंत्रण पथक) तैनात करण्यात आला आहे.
सर्व शिवप्रेमी मंडळ व जनतेला आवाहन करुन सांगण्यात आले आहे की, आम्ही सदैव जनतेच्या सेवेसाठी तयार आहोत. आपण आनंदात व शासनाचे सर्व नियम पालन करुन शिवजयंती साजरी करावी. खालापुर तालुक्यातील जनतेला खालापुर पोलिस यंत्रणेकडून विविध सूचना देण्यात आल्या आहेत.