* इमारतीवर कारवाईसाठी आलेले अतिक्रमण विभाग परतले
ठाणे / अमित जाधव :- दिवा आगासन रोडवर १८ वर्षे जुनी असलेल्या अंनत पार्क या इमारतींवर ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभागाची कारवाईची टांगती तलवार असून येथील रहिवाश्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासन व न्याय व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. आज दिव्यातील अंनत पार्कच्या इमारतीवर कारवाई करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग आला असता संतप्त रहिवाशी व सर्व राजकीय पक्षांनी विरोध करीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले, परिणामी कारवाई न करता त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
वर्षांआधी बांधलेली अनंत पार्क ही सोसायटी 3 इमारतींची आहे. तर मोहन मढवी यांच्या तिसर्या इमारतीमध्ये 14 फ्लॅट सद्या असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. त्या फ्लॅटचे ते इमारत मेंटेनस आणि पाणीबील भरत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. तिसर्या इमारतीतील रहिवाशांचा जागामालकाशी वाद होऊन ते जागेचा सातबारा सोसायटीच्या नावावर करायला गेल्याने तो वाद चिघळला. त्यानंतर जागा मालक मोहन मढवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत माझ्या जागेत अनधिकृत बांधकाम झाले असून ते तोडण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने ती बाब मान्य करुन पालिकेला कारवाईचे आदेश दिले. ठाणे पालिकेने तीन आठवड्यांची मुदत घेऊन ती कारवाई करु असे उच्च न्यायालयाला सांगितले होते. रहिवाशांनी जिवाची पर्वा न करता स्वतःचे घर वाचविण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होऊन रस्त्यावर उतरले. प्रसंगी दिवा शहरातील सर्व पक्षीय नेते त्यांच्या पाठीशी उभे राहून आंदोलनात सहभागी झाले. तर ठाणे जिल्हा संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कारवाई थांबविण्यासाठी सूचना केल्या.
