* परशुराम जयंतीनिमित्त सर्व शाखीय ब्राह्मण सभेचा स्तुत्य उपक्रम
कर्जत / विलास श्रीखंडे :- सालाबादप्रमाणे यंदाच्या मोसमात सुद्धा भगवान परशुराम जयंतीनिमित्त सर्व शाखीय ब्राह्मण सभेच्या माध्यमातून ब्राह्मण क्रिकेट प्रिमियर लीग आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महेश वैद्य यांच्या वैद्य वारियर्स या टिमने निनाद बिडकर यांच्या टिमला अंतिम सामन्यात पराभूत करुन प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले.
माघ शु. द्वादशी १९ फेब्रुवारी रोजी रविवारी संपन्न झालेल्या या लीगसाठी दीपक बेहेरे, रंजन दातार, डॉं. उपेंद्र सुगवेकर, भालचंद्र जोशी, योगेश साठे, सुनील गोगटे, प्रदीप गोगटे, महेश वैद्य, निखिल थत्ते, जयंत लेले, महेंद्र तेरेदेसाई, ॲंड. अजय मेंढी, प्रवीण गांगल, ॲंड. प्रज्ञेश खेडकर, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, राहुल जोशी, पराग करूळकर यांनी विशेष आर्थिक योगदान दिले. तर ऋषिकेश दातार, सार्थक घरलुटे, दिलीप गोगटे, तुषार जोशी, योगेश साठे, निखिल थत्ते, देवेन कुलकर्णी, प्रथमेश कानडे, दिपंकर सालये, अमित भिशीकर, विशाल जोशी, परीक्षित देशपांडे, अथर्व करूळकर यांनी आयोजनची सर्व धुरा सांभाळली.
यंदाच्या ब्राह्मण प्रिमियर लीगमध्ये नंदन भडसावळे व मुकुंद मेढी यांच्या एन.म. इलेव्हन संघाने चौथा क्रमांक, देवेन कुलकर्णी यांच्या कुलकर्णी मंडप संघाने तृतीय क्रमांक, निनाद बिडकर व दिलीप गोगटे यांच्या जय श्री परशुराम संघाने बाजी लढवून द्वितीय क्रमांक मिळविला, तर महेश वैद्य यांच्या वैद्य वारियर्स या संघाने प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब करीत यंदाच्या ब्राह्मण प्रिमियर लीगवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
