* अभिनव ज्ञान मंदिर केंद्रात 1112 विद्यार्थी सहभागी
कर्जत / नरेश जाधव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. राज्यभरातून सुमारे 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत.
कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या केंद्रातून 1112 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मराठी माध्यमाच्या मराठी विषयाच्या पेपरला 802 विद्यार्थी बसले होते. शालेय जीवनातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला पूर्णतः सज्ज झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी 45 खोल्यांमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेची जुनी इमारत, सिनियर कॉलेज इमारत आणि नवीन इमारतीतील वर्गखोल्यांमध्ये प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने भरारी पथके नियुक्त केले आहेत.
