वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलिस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिर

 

खोपोली / प्रतिनिधी :- महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलिस केंद्र बोरघाट यांच्या वतीने अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉं. सुरेश कुमार मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते. महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. 

लायन्स क्लब ऑफ खोपोली, अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकच्या वतीने 13 जाने 2025 रोजी डॉं. रामहरी धोटे सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात खोपोली पोलिस स्टेशनचे कर्माचारी आणि अधिकारी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवरील वाहतूक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य,  महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी, खोपोली रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य त्याचसोबत अनेक वाहन चालक व मालकांसमवेत नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता. रक्तदानाचे परम कर्तव्य पार पाडले गेले. तज्ज्ञ डॉंक्टरांच्या माध्यमातून शिबिरार्थींनी डोळे तपासणी,  रक्तदाब, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हाडांची आणि मणक्यांची तपासणी, कान - नाक - घसा तपासणी, ईसीजी आणि जनरल चेकअप करवून घेतले. याच शिबिरात प्रथम उपचाराची आणि सीपीआरची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. अपोलो हॉस्पिटल संचलित नव्याने दाखल झालेल्या फाईव्ह जी कार्डियाक ॲम्बुलन्सची विस्तृत माहितीही देण्यात आली. 

या शिबिराच्या संपन्नतेसाठी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, उपाधिक्षक जोत्स्ना रासम, पोलिस निरीक्षक पनवेल विभाग भरत शेंडगे, खोपोली पोलिस स्टेशनचे निरीक्षक शितल राऊत, महामार्ग वाहतूक पोलिस केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल शिंदे, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांचा मोलाचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post