खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख पद्माकर पाटील, नगराध्यक्ष रोशना मोडवे, नगरसेविका लता लोते, उज्वला निधी, संपर्क प्रमुख दीपक पाटील, युवासेना अधिकारी अमित जगताप, यशवंत जाधव, बाबू कदम, योगिता पारठे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
