* खोपोली नगर परिषद बालवाडी विभागाच्या स्पर्धा परीक्षा कार्यक्रम उत्साहात संपन्न
खोपोली / मानसी कांबळे :- आजच्या मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात बालवाडीतील लहान-लहान मुलांनी आपल्या ज्ञानाने परिक्षकांची मने जिंकली. ऐवढेच नव्हे तर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रश्न विचारायचे कोणते? असा एक वेळ परिक्षकांना देखील प्रश्न पडला होता. खोपोली नगर परिषद आयोजित बालवाडी स्पर्धांचे 15 ते 17 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता अंतिम फेरी सुरू झाली, त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ अग्निशमन इमारतीच्या हॉल येथे झाली.
सुरूवातीला उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी खोपोली नगर परिषद उपमुख्याधिकारी रणजित पवार, प्रशासकीय अधिकारी रोहन गुरव, बालवाडी व महिला बालकल्याण विभाग लिपीक मीना गायकवाड, महिला व बालकल्याण प्रमुख श्वेता बाराते, संगीत शिक्षक फराट सर, भोसले सर, चौधरी मॅडम, नरावडे मॅडम, पत्रकार मानसी कांबळे, पत्रकार फिरोज पिंजारी, नगररचना विभागाच्या गायकवाड मॅडम, आस्थापना विभागाच्या पाटील मॅडम आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी मुलांना मोबाईल कमी वापरण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फराट सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यामध्ये बालगीत गायनात प्रथम क्रमांक अनन्या श्रावणे, द्वितीय क्रमांक लकी, समरगीत गायनात प्रथम क्रमांक ताकई (ब), द्वितीय क्रमांक शास्त्रीनगर, खेळांमध्ये प्रथम क्रमांक आशित शेवाळे, द्वितीय क्रमांक मुनीर, चित्र ओळखणेमध्ये प्रथम क्रमांक खुशी, जोड्या लावणे स्पर्धा प्रथम क्रमांक सुफियान, द्वितीय क्रमांक विवेक शर्मा यांना मिळाला.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, शिक्षक, पालक यांच्याकडून कौतुक करण्यात आले. तसेच भविष्यात अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. महिला बालकल्याण विभाग लिपीक मीना गायकवाड यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, शिक्षक, पालक, विद्यार्थी, पत्रकार आदींचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.