रायगड / प्रतिनिधी :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व रोहा इंडस्ट्रीज आसोसिएशन, धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरीता 28 जानेवारी, 2025 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, प्लॉट नं. 6, एमआयडीसी धाटाव (ता. रोहा) येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित करण्यात आला आहे, तरी जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे, करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment - Job Seeker (Find A Job) - Job Seeker Login या क्रमाने जावून आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदांना आपल्या शैक्षणिक अर्हताप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये इंटरशिपला अप्लाय करण्यासाठी https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Intern Login ला क्लिक करुन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली प्रोफाईल व शैक्षणिक माहिती अद्ययावत करुन Apply for Jobs ला क्लिक करुन आपला जिल्हा निवडून दिसणाऱ्या आस्थापनेच्या रिक्त पदांना Apply करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड - अलिबागच्या सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141- 222029 किंवा लिपिक-टंकलेखक महेश भा. वखरे यांचे 9421613757 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.