* पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार
रायगड / नरेश जाधव :- शस्रक्रिया करण्याची पदवी असताना आपल्या रूग्णालयात शस्रक्रियेसाठी आलेल्या रूग्णाला स्वत:च भुलीचे (गुंगीचे) इंजेक्शन देण्याचा प्रताप करणाऱ्या येथील एका डॉंक्टराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक, कर्जत प्रातांधिकारी, कर्जत नगर परिषद प्रशासन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तसेच ईमेल द्वारे केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील एका प्रतिष्ठीत रूग्णालयात रूग्णांचा मोठ्या प्रमाणावर उपचार होत असतो. ऐवढेच नव्हे तर अनेक शस्रक्रिया देखील या रूग्णालयात केल्या जात असतात. या रूग्णालयामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. तसेच येथील संबंधित डॉंक्टरांकडे शस्रक्रिया करण्याची पदवी असल्याचे देखील समजते. परंतु संबंधित शस्रक्रिया करताना भूलतज्ज्ञ यांच्यामार्फंत भुल (गुंगीचे) इंजेक्शन दिले जाते. भुल (गुंगी) साठी देण्यात येणारे 'ते' इंजेक्शन पदवी व परवानगी नसताना त्या रूग्णालयाचे डॉंक्टर देत असल्याचे समजते. ऐवढेच नव्हे तर तसा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral) होत आहे. रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईक यामध्ये देखील चर्चा आहे. अनेकांनी तोंडी तक्रार पत्रकार यांच्याकडे केली आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पत्रकार फिरोज पिंजारी यांनी चौकशीचा अर्ज केला आहे.
दरम्यान, अशी पण चर्चा आहे की, चुकीचे इंजेक्शन दिल्याने तसेच चुकीची शस्रक्रिया करण्यात आल्याने अनेक रूग्णांना त्रास झाला आहे. यातील सत्य बाहेर येण्यासाठी संबंधित प्रकरणाची चौकशी होणे खूप महत्वाचे आहे. संबंधित डॉंक्टर व त्यांच्या रूग्णालयातील सर्व डॉंक्टर, नर्स यांच्या पदवी व इतर आवश्यक कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी, जर भुल (गुंगीचे) इंजेक्शन देण्याची त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल किंवा आवश्यक परवानग्या असतील तर आमची कोणतीच हरकत राहणार नाही, असे ही पत्रकार फिरोज पिंजारी यांनी निवेदनात म्हटले आहे. परंतु शैक्षणिक पात्रता नसेल किंवा आवश्यक परवानग्या नसताना जर संबंधित डॉंक्टर भुल (गुंगीचे) इंजेक्शन देत असतील तर हा मोठा गुन्हा आहे. रूग्णांच्या जीवाशी हा खेळ आहे, तरी अशा प्रकरणी संबंधितांवर कार्रवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील पत्रकार पिंजारी यांनी केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, दि. 26 जानेवारी 2025 पासून रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉंक्टर व त्यांना वाचविणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात एल्गार पुकारत जनआंदोलन छेडण्यात येईल आणि तरी ही कार्रवाई करण्यात आली नाही, चौकशी करण्यात आली नाही. किंवा चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास त्यांचे रजिस्ट्रेशन व प्रॅक्टिसची परवानगी रद्द करण्यात आली नाही तर आम्ही 15 फेब्रुवारी 2025 पासून कर्जत येथील टिळक चौकात आमरण उपोषण करू व या आंदोलनातून जनप्रशोभ निर्माण झाल्यास...जनता आक्रमक झाल्यास, संघर्ष निर्माण झाल्यास किंवा आमच्या जीवास अथवा संबंधितांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा शल्य चिकीत्सक, कर्जत प्रातांधिकारी, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत तहसिलदार यांची राहिल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्यास ही बाब गंभीर आहे. पदवी अथवा परवानगी नसताना व आपल्या अखत्यारीत नसलेला उपचार करणे...तसे इंजेक्शन देणे, ही अतिशय गंभीर बाब आहे, तरी याची सखोल चौकशी होणे खूप गरजेचे आहे. निवेदन देवूनही चौकशी होवून सत्य बाहेर येत नसेल तर प्रशासन या प्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येईल. तरी या प्रकरणी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी, नेते यांच्या विरोधात न्यायालयात तसेच ह्युमन राईट्स, मानव अधिकार विभागाकडे जनहितासाठी दाद मागायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे ही निवेदनात म्हटले आहे. तसेच या चौकशीत सर्व काही आलबेल निघाले तर आमची संबंधित डॉंक्टर व त्यांच्या रूग्णालयातील सर्व डॉंक्टर तसेच रुग्णालयाबाबत कोणतीच तक्रार नसणार. तसेच सर्व आलबेल असल्यास ज्या चर्चा अथवा अफवा पसरत आहेत. लोकांमध्ये जो गैरसमज निर्माण होत आहे, त्यातून रूग्णालय व डॉंक्टर सहीसलामत बाहेर पडून गैरसमज दूर होईल. परंतु या प्रकरणी आपण जातीने लक्ष देवून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलतांना न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी म्हणाले की, संबंधित डॉंक्टर यांच्याबाबत तोंडी तक्रार मिळत आहेत. ऐवढेच नव्हे तर एकाने व्हिडीओ देखील दाखविला. माझा त्या डॉंक्टरांशी संबंध देखील नाही. मी त्यांना पर्सनली ओळखत पण नाही. पण ज्या तक्रारी आहेत, त्याची दखल घेत मी अर्ज केला आहे. जर माझ्या अर्जाची दखल घेवून चौकशी झाली आणि सर्व आलबेल निघाले तर मला काही प्राब्लेम नाही. पण जर या तक्रारीत संबंधित व्हिडीओत काही सत्य निघाले तर त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्रवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. अर्ज पडल्यानंतर डॉंक्टर बोलत आहेत की तक्रारदार आम्हाला ब्लॅंकमेल करण्यासाठी हे सर्व करीत आहेत. पण डॉंक्टर यांनी पुराव्यानिशी स्पष्ट करावे की पत्रकार फिरोज पिंजारी त्यांना कधी भेटले आहेत का? कधी त्यांनी फोन केला आहे का? मला डॉंक्टर काय करतात याच्याशी काही देणे-घेणे नाही पण रूग्णांच्या जिवाशी खेळ होत असेल तर पत्रकार म्हणून ते समाज व प्रशासनासमोर आणणे माझे काम आहे आणि मी माझे काम केले आहे. आता प्रशासनाने आपले काम करून सत्य समोर ठेवावे.
