आरटीई २५ % मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मुदत वाढविल्यामुळे अर्ज भरावे - प्राचार्या मोरे मनीषा

 

गेवराई / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचनालय यांचे जावक क्रमांक आरटीई २५ % प्राशीस/ड -८०१/२०२५/२९५दिनांक २७/०१/२०२५ वरील संदर्भानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ % प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी यानुसार राहिलेल्या सर्व पालकांनी आरटीई २५ % प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म ऑनलाईन भरून घ्यावेत, असे आवाहन कै. ची. ओमकार प्रतिष्ठान राहेरी संचलित इरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेज तलवाडाच्या प्राचार्या मनीषा मोरे यांनी केले आहे. 

दुर्बल व वंचित घटकातील पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे ज्यात उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, मुलाचे किंवा मुलीचे आधारकार्ड, वंचित घटकातील कोणत्याही स्वतःचे जात प्रमाणपत्र, दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ४०% आवश्यक आहेत. तरी २५ % मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरीता काही अडचण आल्यास कै. ची. ओमकार प्रतिष्ठान राहेरी संचलित इरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज तलवाडाच्या प्राचार्या मनीषा मोरे यांच्याशी प्रत्यक्ष शाळेच्या वेळेत सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत भेटावे किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ९५६१३२४०१३ /९०११४२०७६७/ ९०४९१०५००३/ ८८३०७११८८०/ ९४२३२४७७१४ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. ज्या पालकांना अडचण आल्यास विचारू शकतात तरी राहिलेल्या सर्व पालकांनी मुदतवाढ दिल्यामुळे सदरील मुदतवाढीचा फायदा घेऊन पाल्यांचा ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन प्राचार्या मनीषा मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post