कलावती सुखदेव पालवे व धनंजय जाधव यांना जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार प्रदान

 


माळशिरस / प्रतिनिधी :- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, क. बा. पा. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर (ता. माळशिरस) या प्रशालेच्या माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका कलावती सुखदेव पालवे (मासाळ) यांना जिल्हास्तरीय 'कृतीशील शिक्षिका' तर ज्युनिअर विभागाचे धनंजय संभाजी जाधव सर यांना 'कृतीशील शिक्षक' पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला जातो. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 8 डिसेंबर 2024 रोजी सिंहगड कॉलेज कोर्टी (ता. पंढरपूर) या ठिकाणी पार पडला. 


कलावती पालवे (मासाळ) व धनंजय जाधव सर यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला. मा. आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सर व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील व शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, प्रशाला समितीचे सभापती हर्षवर्धन खराडे पाटील, प्रशाला समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक निंबाळकर सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post