* स्वाभिमान गहाण ठेवून कोणत्याही संघटनेत काम करू नका!
* राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खलील सुर्वे यांचे देशभरातील पत्रकारांना आवाहन
* 'न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन'ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
सोलापूर / प्रतिनिधी :- 'न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन' ही देशभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी लढा लढणार असून पत्रकार बांधवांनी स्वाभिमान गहाण ठेवून कोणत्याही संघटनेत काम करू नका, असे आवाहन 'न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन'चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खलील सुर्वे यांनी केले आहे. 'न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन'ची आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खलील सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांनी 'न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन'ची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत अश्वनी कुमार राष्ट्रीय महासरचिटणीस, मसूद जावेद कादरी राष्ट्रीय उपाध्यक्ष, आकाश हिवराळे पश्चिम भारत अध्यक्ष, अनिल पवार राष्ट्रीय सचिव, मानसी गणेश कांबळे राष्ट्रीय महिला महासचिव, सुधीर गोविंद माने खजिनदार तथा कोकण प्रदेश अध्यक्ष यांचा समावेश करण्यात आला आहे. तर जेष्ठ पत्रकार प्रविण कोळआपटे राष्ट्रीय मार्गदर्शक असणार आहेत.
याप्रसंगी बोलतांना संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी म्हणाले की, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ही संघटना देशभरातील पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी यांचा स्वाभिमान कायम ठेवत पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य...पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता... पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन...पत्रकारांचे घर...पत्रकारांना इन्शुरन्स...पत्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण... पत्रकारांच्या पार्ट टाईम व्यवसायासाठी मदत..पत्रकारांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामंडळ... पत्रकारांची नोंदणी...डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांची नोंदणी...नविन कायद्याबाबत लढा यावर काम करेल, अशी प्रतिक्रिया दिली.