लतेश शिंदे यांनी शिंदेवाडीच्या शासकिय जमिनीवरील भ्रष्टाचार केला उघड

 


माळशिरस (सोलापूर) / प्रतिनिधी :- माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील लक्ष्मीनगरमधील खाजगी मालकाने सरकारी गट नं. 151 मधील 1 हे 04 आर. बोगस क्षेत्र संबंधित आधिका-यांना हाताशी धरून स्वत:चा गट नं. 119 वर वाढवून घेतले होते. परंतु, सदर जागेत लोकवस्ती असताना त्यांच्याकडे पुरावे असतांना तसेच पूर्वी तेथे शासकीय कामे मंजूर असताना देखील ग्रामपंचायतीने बघ्यांची भूमिका घेवून सदर जागेवरती वाद आहे, असे भासवून अनुसुचीत जाती-जमाती लोकांची फसवणूक व पिळवूक करून विकासापासून वंचित ठेवले आहे.

लतेश शिंदे यांनी ग्रामपंचायतमधील शासकीय कामासंदर्भात लेखी स्वरूपात विचारणा केली असता कित्येक कामात भ्रष्टाचार उघड झाला तसेच काही निकृष्ट दर्जाची कामे म्हणून परत करून घेतली आणि लक्ष्मीनगरमधील विकासाबाबत विचारणा केली असता त्यांना राजकीय हेतूने विनाकरण नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने या जागेत वाद आहे असे वारंवार सांगण्यात येत होते. कागदपत्रे मागणी केली तर उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ केली जात होत. तसेच लक्ष्मीनगरमधील कित्येक दिवस या लोकांचा घर प्रपंच उघड्यावरती मांडला होता. विकास जागेवरच थांबला...गावात कोणीही दखल घ्यायला तयार होईना म्हणून शेवटी या लोकांनी लतेश शिंदे यांची भेट घेतली आणि दादांनी शब्द दिला की, या भूमाफियाच्या गुलामगिरीतून व या वादातून मुक्त करेन, असा शब्द दिला आणि कित्येक वर्षांचा वनवास अखेर दादांनी संपविला. 

खाजगी मालकाने सरकारी गट नं. 151 मधील 1.04 आर. एवढे क्षेत्र बोगस वाढवून घेतले होते. ते कमी करण्याचा आदेश लतेश शिंदे यांनी लक्ष्मीनगरमधील जनतेला न्याय मिळवून दिला आणि दिलेला शब्द खरा करून दाखविला. त्यामुळे गावातील अतिक्रमण करणारे कोमात गेले आहेत. आजपर्यंत ज्याला साथ दिली तो भ्रष्टाचारी निघाला त्यामुळे गाव पुढा-यांची मान शरमेने खाली झाली आहे. आणि आजपर्यंत लतेश दादाला विनाकरण गावात विरोध करतो, कामे अडवितो म्हणून त्याची बदनामी करीत होते. पण आज गावात कित्येक कामात लतेश दादांनी भ्रष्टाचार उघड करून विकास कामे केल्यामुळे आज शिंदेवाडीतील जनता स्वत: म्हणत आहे की, हाच युवा, धाडसी, कणखर नेता गावाला पाहिजे. तरच गावाचा विकास होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. त्याचीच चर्चा सर्व गावात तसेच पंचक्रोशीत पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post