* बहुजन युथ पँथरचा 'दे धक्का'
खोपोली / प्रतिनिधी :- कर्जत विधानसभा मतदार संघातून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरले असून महाराष्ट्रात आक्रमक संघर्ष करणारी संघटना म्हणून नाव असणाऱ्या बहुजन युथ पँथरच्या वतीने किशोर साळुंके यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.
खोपोली, खालापूर मतदार संघात मोठ्या घडामोडी घडत असतानाच महायुती असो अथवा महाआघाडी यांच्यात सरळ लढत वाटत असतानाच दोन्हीही गटबंधनात काही प्रमाणात नाराजीचे सुर दिसत असताना फुटाफूट होऊन एकमेकांना घेऊन लढणे असताना काही जण एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.
बहुजन युथ पँथरच्या वतीने आज किशोर साळुंके यांनी अर्ज भरल्याने या मतदार संघातील अनेक प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल व बहुजन, पीडित, वंचित समाजासाठी न्याय मिळेल असे प्रतिपादन बहुजन युथ पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी व्यक्त केले.