खालापूर तालुक्यात गाजतोय संघर्ष समितीचा आवाज

 


* डॉं. शेखर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली खालापूर संघर्ष समितीची स्थापना

* गाजलेल्या साजगाव ताकई रोडच्या प्रश्नावरील उपोषणात दिला होता अधिकाऱ्यांना गाढवाचा दर्जा 

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुका औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असून गेले काही महिने वारंवार वीज खंडित होण्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. जुनाट असलेली वीज वाहक यंत्रणा व महावितरणचे अकार्यश्रम अधिकारी याला जबाबदार होते. त्रस्त स्थानिक जनतेची वारंवार होणारी मानसिक, आर्थिक, शारीरिक अवहेलना लक्षात घेता कुणीतरी यावर सातत्यपूर्ण सर्वांना एकत्रित करून आवाज उठविणे गरजेचे होते, राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या कल्पक नेतृत्वाने सर्वांचीच मन जिंकणारे डॉं. शेखर जांभळे यांनी जनतेचा त्यांच्यावरती असलेला विश्वास याची सांगड घालून सर्वांना एकत्रित करत महावितरणवर दि. 2 जुलै 2024 रोजी हल्लाबोल केला आणि यंत्रणा गडबडून कामाला लागली.

शहरातील कित्येक समस्यांवर डॉं. शेखर जांभळे हे संकटमोचक व देवदूत म्हणून काम करतात. सामाजिक व राजकीय कार्यातून जनतेला मदत करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्यासारखे भासते. अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करुन समाजात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे असलेल्या डॉं. शेखर जांभळे यांना आपल्या प्रतिकुल काळात समाजाच्या मदतीची जाणीव आहे. यातूनच ते थक्क करणारे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. वर्ल्ड रेकॉर्ड करणारे तालुक्यातील ते पहिले व्यक्तिमत्व असून आजपर्यंत सामाजिक कार्यातून राजकीय कार्यात देखील त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केलेला आहे. नुकताच झालेला साजगाव ताकई रोडचा संघर्ष हा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून देणारा आहे. ऐन दिवाळीत नोव्हेंबर 2023 मध्ये लागोपाठ 13 दिवस तसेच दुसऱ्या वेळेस एप्रिल 2024 मध्ये लागोपाठ 11  दिवस उपोषण करून त्यांनी प्रशासनास जनतेची प्रश्न सोडविण्यासाठी तयार केले आहे. नुकत्याच झालेल्या साजगाव ताकई रोडच्या उपोषणात चक्क दोन गाढवांना अधिकाऱ्यांचे स्वरूप दिल्याने संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात हे आंदोलन अगदी चर्चेचे बनले होते. हे आंदोलन यशस्वी झाल्याने असंख्य नागरिकांनी मनामनातून डॉं. शेखर जांभळे यांना आशीर्वाद दिलेले आहेत.

जनतेच्या मनातील प्रश्न ओळखून दिवसरात्रं पाठलाग केल्याप्रमाणे सातत्यपूर्ण कामातून आपली ओळख बनवणारे हे हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यात वाकबगार आहेत. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वपंथीय व समाजातील गोरगरीब ते धनिक घटकासोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आपल्या मनमोहक स्वभावाने डॉं. शेखर जांभळे यांनी एका दिवसात खोपोली व खालापूर तालुक्यातील व्यापारी, इंडस्ट्रीज मालक, पत्रकार, विविध पक्षांचे नेते, सामान्य नागरिक यांना एकत्र घेऊन अभ्यासपूर्णरित्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि यासंदर्भात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संघर्षाला सुरुवात करून जणु एक इतिहास रचला आहे. महावितरणवर योग्य प्रकारचे नियंत्रण ठेवून नागरिकांना वेळच्यावेळी सूचना देत वीज खंडित झाल्यावर होणारी सूचना आता जनतेला अवगत होत आहे.

खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीज समस्यांनाही हात घालण्यात आलेला आहे. दि. 4 जुलै रोजी खालापूर येथे महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आलेली असून लवकरच हा प्रश्न संघर्ष समितीच्या माध्यमातून मार्गी लागेल. खोपोली खालापूरकरांना अपेक्षित असणारे अनेक समस्यांचे डोंगर आता कमी करण्याची योजना केली असून डॉं. शेखर जांभळे यांनी उचललेले हे शिवधनुष्य पेरण्यासाठी असंख्य सहकारी, ज्येष्ठ नेते, इंडस्ट्रियल, पत्रकार, स्थानिक प्रशासन त्यांना मोलाचे सहकार्य करत आहे. 

खोपोली तसेच खालापूर तालुक्यासाठी ही संघर्ष समिती एक नक्कीच मोलाचे वरदान ठरेल व यानिमित्ताने इच्छाशक्ती असेल तर मनुष्य सत्ता असो वा नसो नक्कीच काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच तालुक्याचा कोहिनूर हिरा अर्थातच डॉं. शेखर जांभळे ठरत आहेत. समस्यांचे निवेदन देवून न थांबता सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची कला अवगत असल्याने त्यांच्या माध्यमातून शहरातील विविध समस्या नक्कीच दूर होतील, असा आशावाद समाजातील सर्वांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post