खालापूर / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी कर्जत-खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज कर्जत येथे कर्जत विधानसभा कार्यकर्ता समिती बैठकीत परिवर्तन हेल्पलाईन ऍपचे उद्घाटन करण्यात आले.
समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ह्या ऍपचा नक्की उपयोग होईल व कर्जत, नेरळ, माथेरान, खोपोली, खालापूर, वावोशी या ठिकाणी कार्यालय होणार आहेत, असे यावेळी किरण ठाकरे यांनी माहिती दिली.
लाडकी बहीण योजना तसेच आपल्या गावातील शहरातील असणाऱ्या समस्यासाठी ह्या हेल्पलाईन नंबरवर 911 944 9099 संपर्क करायचे आहे असे आवाहन किरण ठाकरे यांनी केले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख प्रल्हाद केणी, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, सुनील गोगटे, भाजप खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप, काशिनाथ पार्टे, बिनिता घुमरे, स्नेहा गोगटे, गायत्री परांजपे, संजय कराले, ऋषिकेश जोशी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
