अलिबाग / प्रतिनिधी :– कोकण विभागातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा विशेष संवाद आणि चर्चा सत्र १० फेब्रुवारी रोजी नियोजन भवन,अलिबाग येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी धोरणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतीसाठी शासकीय योजनांचा लाभ या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, कोकणातील कृषी विकासासाठी नव्या संधींवर विचारमंथन होणार आहे.
या बैठकीला शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या संवादाचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
